श्रीमंती म्हणजे काय ?

श्रीमंती आणि सुखी शुभेच्छा,

श्रीमंती म्हणजे काय ?
श्रीमंतीचा अर्थ काय आहे ?
यावर खूप वेगवेगळ्या असे विचार आहेत, काही लोक श्रीमंत याचा अर्थ काहीतरी वेगळा सांगतात.
श्रीमंती हे लघुरुप असून त्याला एक वेगळा अर्थ प्रदान करण्याचा सुद्धा काम केले जात.
यावर कितीतरी लेखसुद्धा लिहिले गेले आहेत आणि त्याचा मतितार्थ एकच आहे, तो म्हणजे श्रीमंती ही पैस्यांशी संबंधित नसून काहीतरी वेगळ आहे अशी दिशाभूल करणे.
अशा पद्धतीचे प्रयोग का केले जातात ?

माइंडसेट कोच असल्या कारणानं  मी या गोष्टींचा अभ्यास केला आणि मला जाणवलं , श्रीमंतीचा अर्थ सर्वांना लहानपणापासूनच प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येक व्यक्तीने श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यांना श्रीमंत होता आल नाही त्यांनी स्वतःच अपयश लपवण्यासाठी श्रीमंतीला वेगळे अर्थ प्रदान करणं सुरू केलं, श्रीमंतीची परिभाषाच बदलण्याचा हा घाट घातला गेलेला आहे.
दुर्दैवाने यात श्रीमंत न होण्याची कारणे शोधण्याचा विचार नाही आला, ही लोकं श्रीमंत होऊ न शकल्याचा कारण आहे पैशांबद्दल असले चुकीचे समज.
मित्रानो, अशा पद्धतीचे लेख आणि अशा पद्धतीचे चर्चा फक्त अशा लोकांमध्ये केल्या जातात जे स्वतः श्रीमंत नाही होऊ शकले जर तुम्हाला अशा गोष्टी वाचायला आणि शेअर करायला आवडत असतील तर कदाचित तुम्ही श्रीमंत नाही आहात.
तुम्हाला श्रीमंत न हो देणारे तुमचे विचार बदलून टाका आणि आयुष्यात श्रीमंतीचा अनुभव घ्यायला सिध्द व्हा.
श्रीमंती या लौकिक जगातील खरे स्वातंत्र्य आहे.
या जगामध्ये श्रीमंतीचा फक्त एक अर्थ आहे, तो म्हणजे भरपूर पैसा.

गरिबीच्या उदात्तीकरणाच्या अशा लेखांपासून आणि अशा विचारांपासून दूर राहा.

योग्य मार्गाने प्रचंड पैसा कमवा,(हो हे सहज शक्य आहे)
योग्य मार्गाने पैसा वाढवा आणि
योग्य कारणासाठी वापरा

सकारात्मक शिका, आयुष्यत वापरा.

श्रीमंत व्हा, सुखी व्हा !

– आशिष भावे,
आंतरराष्ट्रीय मनी अँड लाइफ फ्रीडम कोच.
www.abaow.com

http://bit.ly/2EiuLd6

Leave a Comment