श्री.आशिष रमेश भावे

 

श्री.आशिष रमेश भावे हे इ.स. २००० पासून फायनान्स क्षेत्रामध्ये काम करत आहेत.लाइफ इन्शुरन्स सेक्टर ,म्युच्युअल फंड  सेक्टर आणि फायनानसिअल कन्सल्टंट म्हणून ते काम पाहात आहेत. २०११ पासून ते पुण्या मध्ये फायनानसिअल कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत.

हे काम करताना त्यांनी आत्ता पर्यंत “अर्थ शिक्षण अभियान “ “इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम्स” ह्या सारखे १०० पेक्षा जास्त प्रोग्राम्स त्यांनी मोठ-मोठ्या कंपन्यान मधून, मोठ-मोठ्या सोसायटीज मधून घेतले आहेत.

ह्या सगळ्या माध्यमातून आणि पर्सनल कौन्सेलिंग इ.च्या माध्यामातून आत्ता पर्यंत त्यांनी वीस हजार लोकांना मार्गदर्शन केले आहे आणि हे करताना त्यांना अस वाटत होत कि पैसे कमवायचे जे दोन मार्ग आहेत  एक म्हणजे स्वतः मध्ये गुंतवणूक करून स्वतःची पैसे कमवण्याची कॅपसिटी वाढवणे आणि दुसर म्हणजे कमवलेला पैसा योग्य पद्धतीने गुंतवणे ह्या मध्ये प्रत्येकजण स्वतःच्या क्षमतेनुसार पैसा कमावतो आहे आणि प्रोब्लेम आहे पैश्याच्या योग्य नियोजनाचा !!

पण प्रत्यक्षात हे अस नसून लोकांना प्रोब्लेम आहे कि त्यांना नक्की काय करायला आवडेल त्यांची क्षमता काय आहे हेच लोकांना माहित नाही आहे. त्यातून च श्री आशिष भावे ह्याच्या हे लक्षात आल की पैसे बाबतीत त्या त्या व्यक्ती च्या माइंड सेट वेगवेगळा असतो आणि मग श्री.आशिष भावे ह्यांचा  मनाच शास्त्र माइंडसेट ह्या सारख्या महत्वाच्या गोष्टीवर अभ्यास सुरु झाला. त्या मध्ये त्यांनी इंटरनॅशनल अडवान्सड लाईफ कोच, प्रॅक्टिशनर NLP, मास्टर प्रॅक्टिशनर NLP आणि माईंडसेट कोच, सर्टिफाइड वेलथ कोच, सर्टिफाइड वेलथ कोच अँड ट्रेनर ही सगळी सर्टीफिकेशनस केली.त्या मध्ये त्यांनी स्वतःच स्पेशलायझेशन पैसा आणि पैश्याबद्द्ल चा माइंडसेट ह्या मध्ये केल.

आता ते लोकांना पैसा चांगल्या पद्धतीने कसा कमवता येईल, चांगल्या पद्धतीने तो व्यवस्थापन करून  कसा वाढवता येईल आणि तो चांगल्या पद्धतीने वितरीत कसा करता येईल हे शिकवतात. अश्या पद्धतीने सर्व समावेशक कन्सल्टिंग ,कोचिंग ,मेंटोरिंग ते करतात आणि ह्या साठी त्यांनी “आशिष भावे’ज अकॅडमी ऑफ वेल्थ प्रा.लिमिटेड“ ची स्थापना केली.

ह्या कंपनीचा उद्देश लोकांना श्रींमंत आणि सुखी करणे हा आहे.अश्या पद्धतीच काम आणि एक मोठ ध्येय घेऊन श्री.आशिष भावे ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मनी आणि लाइफ फ्रीडम कोच म्हणून ते ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत.  लोकांना पैश्याबाबतची त्यांची क्षमता ओळखून त्यांना तेवढे पैसे कमवता येऊन त्यांनी त्याचं आयुष्य स्वतंत्र पणे जगता याव हा मूळ उद्देश ही कंपनी स्थापन करण्यामागे आहे.

श्री.आशिष भावे सरांचा एक दृढ विश्वास आहे कि भगवंताने जेव्हा प्रत्येकाला जन्माला घातल आहे त्या सोबत प्रत्येकाला एक वेगळ कौश्यल्य दिलेलं आहे.पण दुर्दैवाने जे संस्कार त्या व्यक्तीवर केले जातात त्यामुळे  भगवंताने दिलेल्या ह्या कौश्यल्याचा विसर पडतो. हे कौश्यल्य जर प्रत्येकाने ओळ्खल आणि त्यावर जर त्या व्यक्तीने काम केल तर ती काम केल तर ती व्यक्ती ह्या विश्वामध्ये दुसऱ्याच्या उपयोगी पडून प्रचंड प्रमाणात पैसा कमवू शकते.प्रत्येका कडे वर्षाला पंचवीस करोड रु कमवायची ताकद आहे अस त्यांना वाटत आणि त्यासाठी लोकांची पैसे कमवण्याची क्षमता त्यांच्या लक्षात आणून देणे हेच त्यांच्या आयुष्याच ध्येय आहे.